बिग बॉस मराठी २: नचिकेतला बघून नेहा शितोळेला अश्रू अनावर

नुकताच एक प्रोमो रिलिज करण्यात आला ज्यात नेहा शितोळेचा नवरा नचिकेत पूर्णपात्रे आजच्या भागात घरात जाणार असून एक भन्नाट कविता म्हणत तो आपली एन्ट्री घेईल.

बिग बॉस मराठी २: नचिकेतला बघून नेहा शितोळेला अश्रू अनावर बिग बॉस मराठी २: नचिकेतला बघून नेहा शितोळेला अश्रू अनावर Source : Press


बिग बॉस मराठी २ च्या घरात अभिजीत बिचुकले यांच्या येण्याने जरी रंगत आली असली तरी भांडण-तंटे आणि रुसवे-फुगवे बघून प्रेक्षकांना बोर होत असणार हे नक्की. पण हा आठवडा फॅमिली वीक असल्या कारणाने थोडी गम्मत येईल असे दिसते.


नुकताच एक प्रोमो रिलिज करण्यात आला ज्यात नेहा शितोळेचा नवरा नचिकेत पूर्णपात्रे आजच्या भागात घरात जाणार असून एक भन्नाट कविता म्हणत तो आपली एन्ट्री घेईल. अर्थातच सर्व सदस्यांना फ्रीझ व्हायचे आहे. प्रोमो मध्ये असेही दिसते की नचिकेत नेहाला घट्ट मिठी मारतो आणि मग तिला अश्रू अनावर होतात.


धाकड गर्ल अशी जरी नेहाची ओळख असली तरी मनाने ती तितकीच हळवी आहे, हे आजच नाही तर या आधी सुद्धा अनेक वेळेला दिसलंय. आतापर्यंत झालेले सर्व टास्क नेहा अगदी चांगल्या पद्धतीने खेळली आहे आणि म्हणूनच विजेतेपदाच्या ट्रोफीसाठी ती एक दमदार दावेदार असू शकते असं सर्वांनाच वाटते.


नचिकेत नंतर अजून कोणाच्या घरचे येणार हे पाहायला एक वेगळीच मज्जा येईल.