बिग बॉस मराठी २: जर शिव ठाकरेची आई बिग बॉसच्या घरात आली तर

रुपाली शिवला म्हणते की जर तुझी आई बिग बॉस च्या फॅमिली वीक मध्ये घरात आली तर काय होईल.

बिग बॉस मराठी २ बिग बॉस मराठी २ Source : Press


बिग बॉसच्या घरातून स्पर्धकांचे एलिमिनेशन झाले, काहींना काढले गेले, तर काहींच्या वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या, अश्यातच गेल्या वर्षी सारखा फॅमिली वीक अजून झालेला नाही.


प्रेक्षकांच्या घरातल्यांना त्यांना भेटण्याची संधी मिळते आणि एकंदरीत इमोशनल असे सारे वातावरण असते. शिव ठाकरे, रुपाली भोसले, नेहा शितोळे, माधव देवचके आणि शिवानी सुर्वे यांच्यात असाच काहीसा संवाद चालू होता. रुपाली शिवला म्हणते की जर तुझी आई बिग बॉस च्या फॅमिली वीक मध्ये घरात आली तर काय होईल.


यावर शिव म्हणतो की "सर्वात पहिला ती माझ्या कानाखाली मारेल. मी कुठे आहे, काय आहे याच्याशी तिला काही घेणं -देणं नसेल." तो पुढे नकळत बोलून गेला कि त्याने काढलेला वीणा च्या नावाचा टॅटू पर्मनंट आहे. "इथे आपल्याला काही माहित नाही पडत म्हणजे तशी गोष्ट आपण इतके दिवस सोबत आहे, बाहेर हे काय पर्मनंट आहे यार. म्हणजे घरी ताई आहे, ताईला सगळं माहित आहे टॅटू कसा राहतो, किती दिवस राहतो, हा निघत नाही तर ताई आईला बसून सगळं सांगणार की त्याने केलं हे. तो एवढा शरीफ बनत होता ना तुझ्यासमोर. ताई मुळेच मी नेहमी मार खातो."


बिग बॉसच्या फॅमिली वीक मध्ये नक्की कोणत्या सदस्यांचे घरचे येणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.