बिग बॉस मराठी २: कोण होणार नवा कॅप्टन?

बिग बॉसच्या मराठी २च्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला वीणा आणि रूपाली यापैकी कोण होणार नवा कॅप्टन?

बिग बॉस मराठी २: कोण होणार नवा कॅप्टन? बिग बॉस मराठी २: कोण होणार नवा कॅप्टन? Source : press


बिग बॉस मराठी २ च्या कालच्या भागात कॅप्टन्सी टास्कची रंगत पाहायला मिळाली. सख्ख्या मैत्रिणी रूपाली भोसले आणि वीणा जगताप एकमेकांसमोर कॅप्टन्सी पदासाठी लढताना दिसल्या.


समुद्रमंथन या कार्याअंतर्गत बिग बॉसने २ टीम्स घोषित केल्या. वीणाचे समर्थक होते शिव ठाकरे, अभिजीत केळकर, किशोरी शहाणे आणि वैशाली माडे तर रूपालीचे समर्थक होते माधव देवचक्के, शिवानी सुर्वे, नेहा शितोळे आणि हीना पांचाल.


पहिल्या फेरीत दोन्ही उमेदवारांना आपल्या टीममधील एका समर्थकाला दुसऱ्या टीमच्या सदस्यांसमोर सांष्टांग नमस्कार घालायचे होते. ज्या टीमचा समर्थक जास्तीत जास्त वेळ नमस्कार घालेल त्या टीमचा उमेदवार विजयी ठरेल. शिव आणि नेहा या कार्यासाठी तयार झाले आणि सर्वात जास्त वेळ नेहाने नमस्कार घातले म्हणून रूपालीला एक गुण मिळाला.


दुसऱ्या फेरीत वीणा आणि रूपालीने आपल्या टीममधील एका समर्थकाला आपले नाव पर्मनंट टॅटूने गोंदवून घेण्यासाठी तयार करायचे होते. वीणाचे नाव गोंदवून घेण्यासाठी शिव तयार झाला तसेच रूपालीचे नाव गोंदवून घेण्यासाठी हीन तयार झाली. या फेरीत दोन्ही टीमचे समर्थक तयार झाल्यामुळे रूपाली आणि वीणा या दोघींना एक एक गुण मिळाला.


तिसऱ्या फेरीत प्रत्येक टीमच्या एका समर्थकाला चिखलाने भरलेल्या टब मध्ये जास्तीत जास्त वेळ बसून राहायचे होते. वीणा कडून वैशाली तर रूपाली कडून माधव या कार्यासाठी तयार झाले. निराशाजनक कामगिरी मुळे दोन्ही टीम या फेरीत असमर्थ ठरल्या आणि कोणालाही गुण मिळाले नाही.


आता पुढे काय होणार? कोण होणार घरचा नवा कॅप्टन? वीणा की रूपाली?


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप