पाणी फॉउंडेशनच्या श्रमदानात यंदा स्पृहा जोशी सहपरिवार होणार सहभागी

आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवून अभिनेत्री स्पृहा जोशी आठवड्याभरातच पाणी फॉउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानाला सुरुवात करणार आहे.

पाणी फॉउंडेशनच्या श्रमदानात यंदा स्पृहा जोशी सहपरिवार होणार सहभागी पाणी फॉउंडेशनच्या श्रमदानात यंदा स्पृहा जोशी सहपरिवार होणार सहभागी Source : Press


अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या फारच बिझी आहे. झाँसीमध्ये सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून आठवड्याभरातच ती आमिर खान यांच्या पाणी फॉउंडेशनच्या श्रमदानात मदत करण्यासाठी सज्ज होणार आहे. इतकेच नव्हे वर्षभर होणाऱ्या पाणी फॉउंडेशनच्या अनेक कार्यक्रमात सहभागी असते. पण यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास आहे. या वर्षीं स्पृहा तिच्या आई आणि काकूसोबत मिळून श्रमदान करणार आहे.


याबाबत स्पृहा म्हणते "पाणी फाऊंडेशनची मोहीम आता चळवळ झालीय. पाणी फाऊंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकरऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. या आनंदात मीही सहभागी होणार असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी होणार आहे."


"मुंबई-पुण्यातल्या सुखवस्तू आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांचे आयुष्य पाणी फाऊंडेशनच्या मोहिमेमुळे मला जवळून पाहायला मिळाले. पाणी फाऊंडेशनसोबत दुष्काळाशी दोन हात करताना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघटित होणारे, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना एक सुखद अनुभव मिळतो."


पाणी फॉउंडेशनची मोहीम जगभरात चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक गाव वॉटर कप स्पर्धेत भाग घेतो आणि दर वर्षी एका गावाला विजेतेपद मिळते. आमिर खान सोबतच अनेक दिग्गज मराठी आणि हिंदी कलाकार सहभागी होतात. गेल्या वर्षी आलिया भट्ट, सई ताम्हणकर, रणबीर कपूर आणि बरेच कलाकार श्रमदानात सहभागी झाले होते.


या वर्षी कोणकोणते कलाकार श्रमदान करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप