पाणीप्रश्नावर भाष्य करणारा 'एक होतं पाणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पाणी या गहन विषयावर भाष्य करणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका... 'एक होतं पाणी' अशी जबरदस्त टॅगलाईन असलेला 'एक होतं पाणी' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आला.

पाणीप्रश्नावर भाष्य करणारा 'एक होतं पाणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पाणीप्रश्नावर भाष्य करणारा 'एक होतं पाणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला Source : Press


राजनीतीवर आधारित अनेक मराठी चित्रपट येऊन गेले आणि प्रेक्षकांना भावले सुद्धा. आता पाणी या गहन विषयावर भाष्य करणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका... 'एक होतं पाणी' अशी जबरदस्त टॅगलाईन असलेला 'एक होतं पाणी' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आला.


मुहूर्त होता याच चित्रपटातील बालकलाकार चैत्रा भुजबळ हिच्या वाढदिवसाचा. 'पाणी टॅंकरचा लय मोठा घोटाळा आहे' या वाक्यानेच टीझरची सुरुवात होते. पाणीविना ओसाड झालेले गाव, पाण्यासाठी भांडणार्या बायका, पाण्यासाठी धडपड करणारा एक तरुण आणि एक चिमुकली असे साधारण चित्र या टीझरमधून बघायला मिळते.


नुकताच पार पडलेल्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाने तब्बल ६ नामांकने मिळवली आणि २ पुरस्कार जिंकले. 'सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर' आणि 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ' हे दोन पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. तसेच नोएडा येथे पार पडलेल्या ६व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये "दखलपात्र ज्युरी पुरस्कार" मिळवला.


आशिष निनगुरकर लिखित या सिनेमात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांचा फौज फाटा पाहायला मिळेल.


व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज, प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ, विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप