पहा तेजस्विनी पंडितने कसा साजरा केला फादर्स डे

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकताच एका वृद्धाश्रमात फादर्स डे साजरा केला.

पहा तेजस्विनी पंडितने कसा साजरा केला फादर्स डे पहा तेजस्विनी पंडितने कसा साजरा केला फादर्स डे Source : Press


१६ जूनचा रविवार जरा खासच होता. वटपौर्णिमा सोबतच फादर्स डे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप सामना असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. फादर्स डे बाबतीत अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच, पण तेजस्विनी पंडितचा फादर्स डे थोडा हटके होता.


तेजस्विनीचे बाबा जाऊन आता अनेक वर्ष झाली पण म्हणून त्यांची शिकवण ती विसरलेली नाही. तेजस्विनीचे बाबा नेहमी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करायचे.


"माझे वडिल आपला वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा करायचे. त्यांना गरजेच्या असलेल्या वस्तू भेट म्हणून द्यायचे. आणि बाबांनी आमच्यावर तेच संस्कार केले. त्यामूळे ते गेल्यावरही मी अनेकदा वृध्दाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवते. ते आपल्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. ज्यास्त मस्तीखोर असतात, असे मला दरवेळी जाणवते. यंदा पहिल्यांदाच मी मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात भेट दिली."


"माझी आई मला नेहमी म्हणते, तुझे बाबा जाताना त्यांचे रूप तुझ्यात सोडून गेलेत. मी दिसण्यातच नाही तर गुणांमध्येही त्यांच्यावर गेलीय. माझे वडिल अत्यंत परखड, स्पष्टवक्ते, रसिक आणि तितकेच मस्तीखोर होते. बाबा हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहे."


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप