तुला पाहते रे: अखेर राजनंदिनीची एन्ट्री होणार?

बातमी अशी आहे की लवकरच तुला पाहते रे या मालिकेत राजनंदिनी म्हणजेच विक्रांतची पहिली पत्नी हिची एन्ट्री होणार आहे.

तुला पाहते रे: अखेर राजनंदिनीची एन्ट्री होणार? तुला पाहते रे: अखेर राजनंदिनीची एन्ट्री होणार? Source : Press


तुला पाहते रे ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. सर्वात जास्त टी. आर. पी कमावणारी ही मालिका आता एका रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. विक्रांत सरंजामेचे खरे रूप आता मालिकेमधून लोकांना दिसत आहे . प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी विक्रांत ईशाचा वापर करतोय आणि आपली खेळी खेळतोय.

आधीच्या भागात विक्रांत ईशाला राजनंदिनी अशी हाक मारून सगळ्यांना अवाक करतो. इशा हीच राजनंदिनी आहे हे वेळोवेळी विक्रांत घरच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. ईशाला अष्टमीला होणार त्रास, तिले परीक्षेत मिळालेले गुण, तिचा स्वभाव या सगळ्या नाट्यमय घटनेने प्रेक्षक खूप खुश होत आहेत.

आता बातमी अशी आहे की लवकरच तुला पाहते रे या मालिकेत राजनंदिनी म्हणजेच विक्रांतची पहिली पत्नी हिची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी राजनंदिनीची भूमिका अभिनेत्री शिल्पा तुळसकर साकारणार अश्या बातम्या पसरत होत्या.

एका नामांकित वृत्तवाहिनीने शिल्पाला याबाबत विचारले तेव्हा ती म्हणाली "मालिकेत राजनंदिनीची एन्ट्री नेमकी कधी होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला जरा थांबावं लागेल आणि काही दिवस अजून वाट पाहावी लागेल."

आता शिल्पानेच असं म्हंटल्यावर थोडा धीर धारायलाच हवा नाही का?


जर तुम्ही कालचा भाग पहिला नसेल तर आम्ही तुम्हाला काय घडले ते थोडक्यात सांगू शकतो. अष्टमी असल्याने ईशाचे बाबा विक्रांतला अंगारा देतात आणि तो तिला रात्री जाग आल्यावर लावायला सांगतात पण विक्रांत तो अंगारा पायदळी तुडवतो. मध्यरात्री इशा अचानक दचकून उठते आणि मला वाचवा मला वाचवा असं म्हणते.

विक्रांत सगळ्या घरच्यांना आपल्या रूममध्ये बोलवून घडलेला प्रकार दाखवतो, तेव्हा ईशा घरच्यांना सांगते की तिला दर अष्टमीला असा त्रास होतो. आईसाहेब घाबरतात आणि त्याचवळी सर्जेराव आईसाहेबांना राजनंदिनीचा मृत्यू अष्टमीलाच झाला आहे याची आठवण करून देतात. पुढील भागात काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप

You may also like