तुमच्या काही आवडत्या नायिकांची शैक्षणिक पात्रता!

आपण ज्या कलाकारांना रोज टीव्हीवर पाहतो ते किती शिकले असतील हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल.

तुमच्या काही आवडत्या नायिकांची शैक्षणिक पात्रता! तुमच्या काही आवडत्या नायिकांची शैक्षणिक पात्रता! Source : Press


अभिनय क्षेत्रात येण्यासाठी शिक्षणाची गरज लागत नाही. सुंदर दिसणे आणि उत्तम अभिनय कौशल्य याची सांगड ज्याला घालता आली तो सकस अभिनेता झालाच म्हणून समजा. आपण ज्या कलाकारांना रोज टीव्हीवर पाहतो ते किती शिकले असतील हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल.


चला तर मग पाहूया आपल्या आवडत्या नायिकांची शैक्षणिक पात्रता.१. सई ताम्हणकर- मराठी सिनेश्रुष्टीला ग्लॅमरस बनवण्यात सई ताम्हाणकरचा खूप मोठा वाटा आहे. मूळची सांगलीची असणारी सई हिने हॉटेल मॅनॅजमेण्ट केलय.


२. तेजश्री प्रधान- आपल्या सर्वांची आवडती जान्हवी मुंबईच्या वझे केळकर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. याच कॉलेज मधून तिने ग्रॅज्युएशन केले आणि अभिनयाचे धडे घेतले.


३. नेहा पेंडसे- फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि दाक्षीणात्य सिनेसृष्टीतही नेहा चांगलीच लोकप्रिय आहे. नेहा १२ वी शिकलेली असून आर्टस् या श्रेणीतून तिने हे शिक्षण घेतले आहे.


४. धनश्री काडगावकर- नंदिता वहिनी काही अशी तशी नसून एम बी ए इन फायनान्स झालेली आहे.


५. मयुरी देशमुख - खुलता कळी खुलेना या मालिकेतली मानसी म्हणजेच मयुरी देशमुख डॉक्टर आहे. मयूरीने डी वाय पाटील इस्न्टिट्यूट नवी मुंबई इथून बॅचलर ऑफ डेंटल सायन्स यामध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.


६. गायत्री दातार- तुला पाहते रे या मालिकेतून नावारूपाला आलेली अभिनेत्री गायत्री दातार हिने इंजिनीरिंग इन इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजि मध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप