झी गौरव २०१९ च्या रेड कार्पेटवर दिसल्या मराठी नायिकांच्या मनमोहक अदा

झी गौरव २०१९ या सोहळ्याला अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी हजेरी लावली. पाहूया अश्याच काही नायिकांच्या मनमोहक अदा

झी गौरव २०१९ च्या रेड कार्पेटवर दिसल्या मराठी नायिकांच्या मनमोहक अदा झी गौरव २०१९ च्या रेड कार्पेटवर दिसल्या मराठी नायिकांच्या मनमोहक अदा Source : Instagram


अवॉर्ड फंक्शन्स म्हंटले की डोळ्यासमोर येतो तो झगमगाट, ते लखलखते वातावरण, आणि अर्थातच नट-नट्यांची हजेरी. असाच एक पुरस्कार सोहळा म्हणजे झी गौरव. दरवर्षीं प्रमाणे याही वर्षी झी गौरव पुरस्कार संपन्न झाले. झी चित्र गौरव आणि झी नाट्य गौरव अश्या दोन विभागात हा सोहळा विभाजित असतो. झी गौरव सोहळ्याच्या नामांकन सोहळ्यानंतर भव्यदिव्य सोहळा पार पडला.


सोहळ्याच्या रेड कार्पेटला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. रेड कार्पेटच्या ग्लॅमरसोबतच कलाकारांच्या वेशभूषेतही ग्लॅमर पाहायला मिळाला.


१. सई ताम्हणकर: सई नेहमीच आपल्या वेशभूषेत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. या सोहळ्याला सईने सिल्वर रंगाचा लेहेंगा घातला होता. तिच्या लेहेंग्यावर नक्षीदार फुलं होती. या लेहेंग्यामध्ये सई खूपच सुंदर दिसत होती.

Saie Tamhankar


२. कल्याणी मुळ्ये: कल्याणी मुळ्ये निळ्या रंगाच्या इरकली साडीत खूप मनमोहक दिसत होती. फक्त कपाळाला चंद्रकोर आणि कानात झुमके इतकेच घालून सुद्धा तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.

Kalyani Mulye


३. सोनाली कुलकर्णी: सोनाली कुलकर्णी नेहमीच वेगवेगळ्या साड्या परिधान करत असते. झी गौरव साठी देखील सोनालीने गडद पर्पल रंगाची साडी नेसली होती ज्याला लाल रंगाची बॉर्डर होती. गळ्यातला भारी नेकलेस साडीवर अधिकच शोभून दिसत होता.

Sonali Kulkarni


४. श्वेता शिंदे: लाल रंगाचा चकाकणारा गाउन घालून श्वेता शिंदे रेड कार्पेटवर आली. श्वेता नेहमीच ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या समोर आली आहे, त्यामुळे तिच्या या लूकने लोकांना घायाळ नाही केलं तर नवलच.

Shweta Shinde


५. प्रिया बेर्डे आणि किशोरी शहाणे: प्रिया बेर्डे आणि किशोरी शहाणे या दोघी अप्सरांनी गडद पिवळ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. प्रिया बेर्डेची साडी थोडी पारंपरिक असून किशोरी यांची साडी थोडी ग्लॅमरस होती. त्या दोघी खूप खूप सुंदर दिसत आहेत.

Kishori and Priya


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप