जीव झाला येडापिसा: सिद्धी आणि शिवामध्ये रोमान्स फुलणार

जीव झाला येडापिसा ही मालिका आता एक रंजक वळण घेत असून सिद्धी आणि शिवा मध्ये रोमान्स फुलताना दिसणार आहे

जीव झाला येडापिसा: सिद्धी आणि शिवामध्ये रोमान्स फुलणार जीव झाला येडापिसा: सिद्धी आणि शिवामध्ये रोमान्स फुलणार Source : Press


कलर्स मराठी वरील जीव झाला येडापिसा ही मालिका आता एका नव्या वळणावर येत आहे. सिद्धी आणि शिवामध्ये नेहमीचे भांडण पाहून जर तुम्ही बोर झाला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.


सिद्धी आणि शिवामध्ये आता रोमान्स पाहायला मिळणार असून येत्या काही भागात त्याची झलक बघायला मिळेल. एका प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले की शिवाची बहीण सोनल सिद्धीला शिवाच्या शर्टचे बटन शिवून द्यायला सांगते. सिद्धी यामुळे जरा आश्चर्यचकित होते. पण शिवासमोर ती काहीही बोलत नाही.


येत्या भागात शिवा आणि सिद्धीमध्ये काही रोमँटिक क्षण सुद्धा पाहायला मिळतील. अगदी कमी वेळात ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेचे संवादही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


तुम्ही पाहताय का ही मालिका? शिवा आणि सिद्धीची जोडी तुम्हाला आवडतेय का? आम्हाला नक्की सांगा .