जागतिक रंगभूमी दिन: सध्या रंगभूमीवर गाजत आहेत ही ५ नाटकं

सध्याच्या सिनेमाच्या काळात, नाटक हा प्रेक्षकांसाठी दुय्यम पर्याय ठरत असला तरी मराठी कलाकार मात्र नाटकालाच पहिली पसंती देतात. तरी या जागतिक रंगभूमी दिनी पाहूया कुठली ५ मराठी नाटकं रंगभूमीवर गाजत आहेत.

जागतिक रंगभूमी दिन: सध्या रंगभूमीवर गाजत आहेत ही ५ नाटकं जागतिक रंगभूमी दिन: सध्या रंगभूमीवर गाजत आहेत ही ५ नाटकं Source : Press


इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) १९६२ पासून २७ मार्च हा दिवस 'जागतिक रंगभूमी दिन' (World Theatre Day) म्हणून साजरा करतं. प्रत्येक कलाकाराचं पाहिलं प्रेम म्हणजे रंगभूमी. कलाकाराची खरी कसोटी असते ती रंगभूमीवर. त्याचा रंगभूमीवरचा वावर, त्याची अभिनय क्षमता, त्याचा तो प्रेक्षकांशी साधलेला संवाद यातून एखादा कलाकार किती कुशल असू शकतो याचा अंदाज मांडता येतो.


मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दिग्गज भारतात आहेत. डॉक्टर श्रीराम लागू, विजय चव्हाण, भरत जाधव, प्रशांत दामले सोबतच दुर्गा खोटे, सुलभा देशपांडे, कविता लाड, आणि अजून बरेच कलाकार महाराष्ट्राला या रंगभूमीने दिले. सध्याच्या सिनेमाच्या काळात, नाटक हा प्रेक्षकांसाठी दुय्यम पर्याय ठरत असला तरी मराठी कलाकार मात्र नाटकालाच पहिली पसंती देतात.


तरी या जागतिक रंगभूमी दिनी पाहूया कुठली ५ मराठी नाटकं रंगभूमीवर गाजत आहेत.१. दादा एक गुड न्यूज आहे: काही दिवसांपुर्वी पुण्याच्या रस्त्यांवर 'दादा मी प्रेग्नन्ट आहे' असे पोस्टर्स झळकले होते. त्या पोस्टर्स मागचे रहस्य उलगडत 'दादा एक गुड न्यूज आहे' या नवीन नाटकाचा शुभारंभ झाला. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे अभिनित या नाटकाला प्रेक्षनकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. प्रिया बापट या नाटकाची निर्माती असून कल्याणी पाठारे याची लेखिका आहे.२. मोरूची मावशी: विजय चव्हाण यांनी साकारलेली मोरूची मावशी कोणी विसरूच शकणार नाही. आता जरी हा अभिनेता आपल्यात नसला तरी त्यांची भूमिका गाजवायला मोरूची मावशी पुन्हा येत आहे आणि मावशी साकारली आहे भरत जाधव यांनी.३. अ परफेक्ट मर्डर: आल्फ्रेड हिचकॉक यांच्या कथेवर आधारीत 'अ परफेक्ट मर्डर' घेऊन तब्बल १९ वर्षानंतर दिग्दर्शक-अभिनेता सतीश राजवाडे रंगभूमीवर परतला. सतीश राजवाडे, पुष्कर श्रोत्री, श्वेता पेंडसे आणि अभिजित केळकर अशी तगडी मंडळी या नाटकात पाहायला मिळते.४. तिला काही सांगायचंय: 'एक बंडखोर नाटक' अशी या नाटकाची टॅगलाईनच आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आस्ताद काळे या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नवरा बायकोमध्ये हाताळले जाणारे विषय तिला काही सांगायच्या मध्ये अगदी स्पष्टपणे मांडले आहेत.५. इडियट्स: सागर कारंडे आणि स्मिता तांबे ही जोडी रंगमंचावर इडियट्स हे नाटक घेऊन आलेत. लग्नाबद्दलच्या संकल्पनेत झालेला बदल आणि लग्न संस्थेबददलचा गोंधळ या नाटकात पहायला मिळणार आहे.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप