अशी असेल आनंद इंगळेची मोगरा फुलला मधील भूमिका

स्वप्नील जोशी अभिनित मोगरा फुलला या चित्रपटात आनंद इंगळेची महत्वाची भूमिका आहे. जाणून घ्या कशी असेल त्याची भूमिका.

अशी असेल आनंद इंगळेची मोगरा फुलला मधील भूमिका अशी असेल आनंद इंगळेची मोगरा फुलला मधील भूमिका Source : Pressस्वप्नील जोशी अभिनित मोगरा फुलला हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. मग त्या चित्रपटाची गाणी असो नाहीतर नवनवे पोस्टर्स असो सगळंच चर्चेत आहे. सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या भूमिकेत असणाऱ्या स्वप्नीलला बँक मॅनेजर आनंद एक हितचिंतक म्हणून लाभतो आणि हीच गोष्ट आनंदची चिटपातील भूमिका महत्वाची बनवते."या चित्रपटातील बँक मॅनेजरची भूमिका वेगळी आहे. स्वप्नीलबरोबरचे हे नाते म्हटले तर व्यावसायिक आहे, म्हटले तर मैत्रीचे आहे. चित्रपटाची कथा वेगळी आहे आणि यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही तावून सुलाखून निघालेली आहे. त्यामुळे ही भूमिका करताना खूप मजा आली. प्रतिभावान अशा श्रावणीताई देवधर यांच्याबरोबर काम करताना वेगळा अनुभव मिळाला" आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आनंद म्हणतो.मोगरा फुलला मध्ये स्वप्नील आणि आनंदबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांचा फौजफाटा आहे. चंद्रकांत कुलकर्णी, नीना कुळकर्णी, संदिप पाठक, सई देवधर, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख असे अनेक कलाकार आहेत.
मोगरा फुलला हा चित्रपट १४ जून पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 

You may also like