अमेय वाघची 'गर्लफ्रेंड' बनली सई ताम्हणकर

काही दिवसांपूर्वी अमेय वाघ गर्लफ्रेंडच्या शोधात होता. आता त्याचा शोध पूर्ण झाला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर त्याची गर्लफ्रेंड बनली आहे.

अमेय वाघची 'गर्लफ्रेंड' बनली सई ताम्हणकर अमेय वाघची 'गर्लफ्रेंड' बनली सई ताम्हणकर Source : Twitter


मराठीतला ढाण्या वाघ अमेय वाघ काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंडच्या शोधात होता. सोशल मीडियावर तशी पोस्टही त्याने शेअर केली होती. आता तुम्ही म्हणाल की लग्न झालेला अमेय गर्लफ्रेंड का शोधतोय? झालं असं की अमेयचा नवा सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे गर्लफ्रेंड. या सिनेमात अमेय नचिकेत नावाचं पात्र साकारतोय पण नचिकेतला त्याची गर्लफ्रेंड मिळताच नव्हती.त्यासाठी अमेयने सोशल मीडियाचा आधार घेतला. सोनाली कुलकर्णी, इशा केसकर, पर्ण पेठे, अशा अनेक अभिनेत्रींनी अमेयला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल विचारले, शेवटी अमेयने खुलासा केला की सई ताम्हणकर त्याची गर्लफ्रेंड आहे. होय, सई गर्लफ्रेंड या सिनेमात अलिशा नावाचं पात्र साकारताना दिसणार आहे.मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच सई आणि अमेय एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटासाठी अमेयनं चक्क आठ किलो वजनही वाढवलंय म्हणे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला.उपेंद्र सिधये दिग्दर्शित हा सिनेमा प्रस्तुत करत आहेत ह्यूज प्रोडक्शन्स आणि प्रतिसाद प्रोडक्शन्स. येत्या २६ जुलै ला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप