अभिनेत्री स्मिता तांबे करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

अभिनयात निपुण असणारी स्मिता तांबे आता निर्मिती क्षेत्रात आपले नशीब अजमावणार आहे.

अभिनेत्री स्मिता तांबे करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण अभिनेत्री स्मिता तांबे करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण Source : Press


अभिनेत्री स्मिता तांबेला नेहमी आपण रुपेरी पडद्यावर अभिनय करताना पाहिले आहे. पण आता स्मिता पडद्याआड जाऊन निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे. महिला सशक्तीकरण हा विषय घेऊन स्मिता निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे. सुपरनॅचरल थ्रिलर असलेला ‘सावट' आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित' या चित्रपटाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स' आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.' सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन' प्रॉडक्शन हाऊस करते आहे.

स्मिता म्हणते "उंबरठा आणि ‘जैत रे जैत' च्या स्मिता पाटील यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक' सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची ‘चौकट राजा' मधली भूमिका, ‘उत्तरायण' मधली नीना कुलकर्णींची भूमिका या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलंय. म्हणूनच असावं कदाचित मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलीस अधिका-याची आहे."

"सौरभ फिल्म घेऊन आला तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी चित्रपटात काम करण्यासोबतच याची निर्मिती करायचं ठरवलं" स्मिता पुढे म्हणते. फक्त निर्मितीच नाही तर स्मिता या चित्रपटात अभिनयही करणार आहे.

स्मिताबरोबरच या सिनेमात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव हे कलाकारही झळकतील. २२ मार्च, २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

Download The Lehren App For Latest & More News, Gossips And Videos.