अभिनेत्री सारा श्रावणच्या डोहाळे जेवणाचे फोटो तुम्ही पाहिले का?

मराठी अभिनेत्री सारा श्रवण लवकरच आई होणार आहे. पहा तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटोस.

अभिनेत्री सारा श्रावणच्या डोहाळे जेवणाचे फोटो तुम्ही  पाहिले का ? अभिनेत्री सारा श्रावणच्या डोहाळे जेवणाचे फोटो तुम्ही पाहिले का ? Source : Press


पिंजरा या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री सारा श्रावण लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच साराने या गोष्टीचा खुलासा केला. आपल्या सोशल साईट इंस्टाग्राम वर तिने आपल्या नवर्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिले की लवकरच त्यांच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे.साराने आपल्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटोस सुद्धा शेअर केले आहेत. या फोटोसमध्ये ती अधिकच खुलून दिसतेय. सारा आणि गणेश यांनी तीन वर्षांच्या नात्यानंतर २४ एप्रिल २०१४ रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगितली होती. आता त्यांच्या लग्नाला ५ वर्ष झाली आहेत.पिंजरा या मालिकेनंतर तिने 'अनोळखी', 'तू तिथे मी' या अनेक मालिकांमध्ये काम केले. याशिवाय 'एकापेक्षा एक' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये आपल्या डान्सचीही तिने झलक दाखवली. होती. तिच्या अभिनयासोबतच नृत्याची या कार्यक्रमामुळे चांगलीच चर्चा झाली होती.पहा तिचे काही फोटोस.


तुझ्या नव्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सारा.