अभिनय क्षेत्रातील तारा निखळला! रमेश भाटकर यांचे निधन

रमेश भाटकर यांचे ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेली वर्षभर कॅन्सरशी चाललेली त्यांची झुंज अखेर काल संपली.

अभिनय क्षेत्रातील तारा निखळला! रमेश भाटकर यांचे निधन अभिनय क्षेत्रातील तारा निखळला! रमेश भाटकर यांचे निधन Source : Twitter


मराठी सिनेश्रुष्टीत अनेक कलाकार आहेत ज्यांनी पोलिसांच्या भूमिका अजरामर केल्या. त्यातलेच एक रमेश भाटकर. टीव्ही मालिका, नाटक, तसेच मराठी व हिंदी चित्रपटातून आपला सकस अभिनय दाखवणारा हा लाडका अभिनेता आता आपल्यात नाही.

रमेश भाटकर यांचे ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेली वर्षभर कॅन्सरशी चाललेली त्यांची झुंज अखेर काल संपली. काल जागतिक कर्करोग दिनी त्यांचं जाणं जीवाला चटका लावणारं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन आणि सून असा परिवार आहे.

३ ऑगस्ट १९४९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. रमेश भाटकर यांचं बालपण मुंबईत गेलं, प्रसिद्ध संगीतकार स्नेहल (वासुदेव) भाटकर हे त्यांचे वडील.

'हॅलो इन्स्पेक्टर', 'युगंधरा', 'दामिनी', 'बंदिनी', 'कमांडर' या त्यांनी अभिनय केलेल्या गाजलेल्या मालिकांपैकी काही मालिका. तसेच 'माहेरची साडी' या चित्रपटतील त्यांची भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहील.

रंगभूमी हे त्यांचं पहिले प्रेम. ‘अश्रूंची झाली फुले' मधला लाल्या सर्वांच्याच परिचयाचा. 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' मालिकांमधून हल्लीच ते आपल्याला दिसले होते.

अनुपम खेर अभिनित 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा रमेश यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली आहे.

गेल्याच वर्षी ९८व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्काराने गौरव झाला होता.

रमेश यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला अस म्हणायला हरकत नाही. आपला लाडका अभिनेता आपल्यात नाही याची खंत कायम जीवाला राहील. 

Download The Lehren App For Latest & More News, Gossips And Videos.

You may also like