अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठी २ मध्ये परतणार का?

अभिजीतविरुद्धची तक्रार मागे घेण्यात आली असून त्याच्या बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठी २ मध्ये परतणार का? अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठी २ मध्ये परतणार का? Source : Press


बिग बॉस मराठी २ मधून अचानक अभिजीत बिचुकले हा उमेदवार गायब होतो. त्याच्या गायब होण्यामागचे कारण सगळ्यांना माहित आहेच. टीव्हीवर झळकणाऱ्या अनेक बातम्या अस सांगत होत्या की बिचुकलेविरोधात फिरोज पठाण या माणसाने खंडणीची तक्रार केली होती. तक्रार नोंद होताच सातारा पोलीस मुंबईला रावाना झाले आणि बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला धरून घेऊन गेले.पण आताच हाती आलेल्या माहितीनुसार अभिजीतविरुद्धची तक्रार मागे घेण्यात आली असून त्याच्या बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फिरोज पठाण यांनी न्यायालयात असे लिहून दिले की ही तक्रार ते स्वतःहून मागे घेत आहेत.'अभिजीत बिचुकले ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरात खेळत आहे ते पाहाता तो नक्कीच जिंकेल. अभिजित बिचुकलेमुळे साताऱ्याचे नाव उंचावले आहे' असं पठाण म्हणाले.खंडणीची तक्रार दाखल केल्यानंतर बिचुकलेला न्यायालीयन कोठडीही सुनावण्यात आली होती. अभिजीत बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. सहकलाकारांबरोबर त्याच भांडण असो नाहीतर नवोदित घरात प्रवेश करणाऱ्या हीना पंचलसोबतची मस्ती असो, बिग बॉसचा टी आर पी बिचुकलेमुळे चांगलाच वाढला.आता बिचुकले बिग बॉसच्या घरात परत प्रवेश करणार का? याकडे साऱ्यांचेच लाख लागले आहे.खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप