अजय देवगनच्या तानाजी मध्ये धैर्यशील घोलपची वर्णी

देवदत्त नागे सोबतच आणखी एक मराठी अभिनेता तानाजी या चित्रपटात झळकणार असून त्याच नाव आहे धैर्यशील घोलप.

अजय देवगनच्या तानाजी मध्ये धैर्यशील घोलपची वर्णी अजय देवगनच्या तानाजी मध्ये धैर्यशील घोलपची वर्णी Source : Press


मणिकर्णिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांच्यावर अभिनेत्री कंगना राणावत हिने चित्रपट केला. आता आणखी एका ऐतिहासिक पुरुषावर चित्रपट येत असून अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं नाव आहे तानाजी आणि तो आधारित आहे तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर.


या चित्रपटाचा पहिला लुक बाहेर आला असून आता अशी माहिती मिळतेय की एक मराठी अभिनेता या चित्रपटात झळकणार आहे. एकाच या जन्मी जणू, लकी आणि एक तारा फेम धैर्यशील घोलप तानाजी चित्रपटात काम करणार असून त्यानेच ह्याची माहिती दिली.


एका वृत्तवाहिनीशी बोलताना धैर्य म्हणतो "कोणत्याही अभिनेत्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम करणं, हे स्वप्नवत असतं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यावर मी मराठी नाटक, मालिका, शॉर्ट फिल्म आणि कमर्शिअल फिल्म्समध्ये छोट्या-मोठ्या भूमिका वठवत गेलो. तेव्हा कधी ना कधी ग्लॅमरवर्ल्डमधल्या मोठ्या स्टार्ससोबतही आपण काम करावं ही इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण होतेय."


"मी आत्ताच माझ्या भूमिकेविषयी जास्त बोलू शकत नाही. सध्या सिनेमावर कसून मेहनत घेतोय. आणि मिळालेल्या संधींचं सोनं करण्याची इच्छा आहे.''


तानाजी या चित्रपटात सैफ अली खान उदय भान यांच्या भूमिकेत असून काजोल लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत असणार आहे. जय मल्हार फेम देवदत्त नागे सुद्धा या सिनेमात दिसेल.


खमंग आणि ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा लेहरें ऍप